Top News खेळ

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका पाहण्याचा विचार करताय?; थोडं थांबा BCCI देणार गुडन्यूज!

मुंबई | भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. आता भारताला आव्हान आहे ते कसोटीमध्ये बलाढ्य मानल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाचं. भारतीय चाहतेही आतुरतेने या मालिकेची वाट पाहत आहेत. ही मालिका सुरू होण्यापुर्वी बीसीसीआय चाहत्यांना गुडन्यूज देणार आहे.

भारत आणि इंग्लंड संघांमधील सामने चेन्नईच्या चेपॉकवर होणार आहेत. त्यानंतरचे दोन सामने अहमदबादमदील माटेरा येथे खेळवण्यात येणार आहे. हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याची माहिती समजत आहे.

मैदानाच्या आसनव्यवस्थेच्या 50 टक्के चाहत्यांना हा सामना पाहता येणार आहे. याबाबत जिथे सामना होणार आहे तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं समजत आहे.

दरम्यान, ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्वाची आहे. या दौऱ्यात चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन वनडे सामने असणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया; पाटील हे…

…तर जयंत पाटील मुख्यमंत्री होणार; अजित पवारांनीही दिला पाठिंबा

प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही- उर्मिला मातोंडकर

“राजकीय हवा बदलली आहे, भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात”

अजिंक्यच्या नावाचा मराठी चित्रपटसृष्टीशी आहे हा जुना संबंध; मधुकर रहाणेंनी सांगितली नावामागची खास बात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या