Top News

ईडीकडून प्रताप सरनाईकांना तिसऱ्यांदा समन्स; 10 डिसेंबरला हजर राहण्याची सूचना

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलाय. त्यानुसार 10 डिसेंबर राेजी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

24 नोव्हेंबर रोजी सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाणे, मुंबईतील घर व कार्यालयावर छापे टाकले. टॉप्स सिक्युरिटीज ग्रुप आणि सरनाईक यांच्यात संशयास्पद व्यवहारांचे पुरावे सापडल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

यानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर रहाण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी कारण देत जाणं टाळलं.

तर प्रताप सरनाईक यांनी क्वारंटाईन असल्याचं सांगत ईडीच्या नोटीसीकडे दुर्लक्ष केलं. शिवाय 14 दिवसांचा कालावधी मागितला असता ईडीने तो फेटाळून लावत 10 डिसेंबरला हजर राहण्याची सूचना केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री महोदय, डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा”

रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात

दिल जीत लिया दिलजीत!; शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी दिले 1 कोटी

“मंत्रिपद गेलं तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू”

नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या