सिडनी | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील रंगतदार ठरलेला तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित झालाय. दुखापतग्रस्त योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरत हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी तब्बल 259 बॉल खेळून काढत सामना अनिर्णित केला आहे.
तिसरा कसोटी सामना अनिर्णित ठरल्याने बॉर्डर गावस्कर मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. फलंदाजी करताना अश्विन-विहारी दोघंही दुखापतग्रस्त होते. मात्र दोघांनीही संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा विजयाचा घास हिरावून घेतला.
ऑस्ट्रेलियाने भारताला 407 धावांचं आव्हान दिलं होतं. याचा लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 5 विकेट्स गमावत 334 धावा केल्या. यामध्ये दुखापतग्रस्त रिषभ पंतने 118 बॉल्समध्ये 97 धावा करत भारताला एक भक्कम बाजू उभी करून दिली.
दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अश्निन-विहारी यांची जोडी फोडण्यासाठी स्लेजिंगचा देखील वापर केला. मात्र संयम न ढासळता दोघांनी उत्कृष्ट फलंदाजी करत टीमवरील पराभवाचं सावट दूर केलं.
थोडक्यात बातम्या-
चेंडू छेडछाडीनंतर हे वाईट कृत्य करताना स्मिथ सापडला रंगेहात; पाहा व्हीडीओ
पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पेनला आयसीसीने दिला झटका!
खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार
सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार
इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा