बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही”

नवी दिल्ली | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशात ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर चार आठवड्यांतच तिसरी लाट आली होती. लोकांनी नीट दक्षता घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर हीच स्थिती आपल्याकडेही उद्भवू शकते, असं वक्तव्य कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी केलं होतं. मात्र यावर राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीच्या कार्यगटातील सदस्यांनी आक्षेप घेतलाय.

महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. अशा वेळी लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणारे वक्तव्य डॉ. जोशी यांनी केले आहे, असा आक्षेप एनटीएजीआयमधील तज्ज्ञांनी घेतला.

देशातील 50 ते 60 टक्के जनतेला सामूहिक प्रतिकारशक्तीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत तरी तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. याआधी केलेल्या सिरो सर्वेक्षणांतही ही बाब स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्रात येत्या दोन ते चार आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, या वक्तव्याला कोणत्याही शास्त्रीय निरीक्षणाची जोड नाही, असं एनटीएजीआयने म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकारांमुळे या साथीच्या तिसऱ्या लाटेत 2 वर्षे किंवा त्यापुढील वयाच्या मुलांवर विपरित परिणाम होणार नाही, असं एम्सने केलेल्या नव्या पाहणीच्या निष्कर्षांत म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीनं सांगितला गेम प्लॅन, म्हणाला…

“पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय”

‘SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा’; MPSC चं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक

मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक; 11 पैकी ‘या’ 6 मागण्या ठाकरे सरकारला मान्य

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More