बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक”

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

बालरोग आणि संसर्गजन्य रोगांचे तज्ञ म्हणतात की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहाता लहान मुलांच्या लसीकरण कार्यक्रमालाही सुरुवात केली पाहिजे. सरकारने या संदर्भात कोणतीही त्वरित पावले उचलली नाही तर कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी प्राणघातक ठरू शकते.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे, अशात लहान मुलांना लस न दिल्यास धोका आणखी वाढू शकतो. यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस सर्वात मोठं शस्त्र मानली जात आहे, असं संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान मुलं मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. अशात तिसरी लाट आल्यास, ही लाट सर्वाधिक घातक लहान मुलांसाठीच ठरेल. अशात आता लहान मुलांनाही लवकरात लवकर लस देण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

“आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं”

खुशखबर! यंदा पाऊस वेळेवरच, 10 जूनपर्यंत पाऊस कोकणात धडकणार

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणातील ‘या’ आरोपीला जामीन मंजूर

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत; अशी करत होता अंमली पदार्थांची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More