बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! देशातील 13 राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकणार

नवी दिल्ली | कोरोना महामीरीने संपूर्ण जगभर थैमान घातलं. देशात धुमाकूळ घातलेली कोरोनाची दुसरी लाट आता काही ठिकाणी ओसरत असल्याचं चित्र दिसत होतं. लॉकडाऊन निर्बंध शिथिल केल्यानंतर परिस्थिती हळूहळू रूळावर येत होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) टांगती तलवार देशावर कायम आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट दिलासादायक होती पण देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती वाढली आहे. देशातील तब्बल 13 राज्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे त्यामुळे केंद्र सरकारही अलर्ट मोडवर गेलं आहे. नव्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना बाधितांच्या मृत्यूदरात मात्र वाढ झाली आहे.(Third Wave of Corona to Hit 13 States)

लग्नसराई, सणवार यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारपेठात गर्दी करत आहेत. ही गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याचं आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे. कोरोनाची तिसरी लाट आली तर 13 राज्य पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. (Central Goverment on High Alert)

केंद्र सरकारकडून या 13 राज्यांना विशेष खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित 13 राज्यांना पत्र लिहून तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे आणि कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री मानसी नाईकचा चुलीवर स्वयंपाक करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

“घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन…”

“ते एक बंद षडयंत्रच होतं”, मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याची चर्चा म्हणजे…”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More