बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये, मात्र… – उदय सामंत

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सगळीकडे थैमान माजवलं आहे. कोरोना काळात सगळंच ठप्प झालेलं पहायला मिळालं होतं. काॅलेजेसही बंद करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ऑनलाईन शिक्षण घेण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. अशातच कोरोना आटोक्यात आला असताना आता पुन्हा एकदा सगळं चालू होत आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये देखील चालू करण्याचा विचार चालू आहे.

कोरोनामुळे गतवर्षी सगळं ऑनलाईन करण्यात आलं होतं. मात्र यंदाचं वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार चालू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

दिवाळी सुरु होईल त्यामुळे आता दिवाळीनंतर 1 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा विचार चालू आहे. तेव्हाच ऑफलाईन म्हणजेच फिजिकली शाळा सुरु होतील. काॅलेज सुरु करण्याविषयी टास्क फोर्सची चर्चा करुन एसओपी बनवली जाईल, मात्र अखेरचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच असेल, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात अनेकांवर वाईट परिस्थिती असल्यामुळे महाविद्यालयात यावं की नाही ही हे विद्यार्थ्यांनी ठरवावं. उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स

“डोकंच नसेल तर शरीराचा काय फायदा? सेनापतीच नाही तर लढायचं कसं?”

रेल्वे स्टेशनवर सापडला होता नारायण, MPSCतून बनला अधिकारी; बच्चू कडूंचंही योगदान!

पुण्यातील उद्यानाच्या नावावरुन नवा वाद, ‘साध्वी’ शब्द हटवण्याची मागणी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More