दोन मुलांचा पिता असलेला ‘हा’ अभिनेता आहे रश्मिकाचा क्रश, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का
मुंबई | दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनाला (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नॅशनल क्रश (National Crush) म्हणून संबोधलं जातं. मात्र, अनेक तरूणांची क्रश असलेल्या रश्मिकाचा क्रश कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना अनेकदा पडतो. एका मुलाखतीत बोलताना रश्मिकानेच या प्रश्नाचा खुलासा केला आहे.
रश्मिकाचं नाव दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devrakonda) सोबत जोडलं जातं. ‘गीता गोविंदम’, ‘डिअक कॉम्रेड’ या चित्रपटातील विजय आणि रश्मिकाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. रश्मिकाचा क्रश दुसरा तिसरा कोणी नसून विजयच आहे. मात्र, रश्मिकाचा क्रश विजय देवरकोंडा नाही तर दाक्षिण्यात्य सुपरस्टार थालापथी विजय (Thalapathy Vijay) आहे.
रश्मिका विजयची खूप मोठी चाहती असल्याचं तिने ‘भीष्म’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सांगितलं होतं. तामिळ सुपरस्टार थालापथी विजय रश्मिकाचा खूप मोठा क्रश असून तिला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचं देखील रश्मिकाने बोलून दाखवलं होतं.
दरम्यान, अल्लू अर्जून सोबतच्या ‘पुष्पा’ चित्रपटानंतर ही ‘श्रीवल्ली’ फक्त दक्षिणेतच नाही तर देशभरातील घराघरात पोहोचली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना आज तिचा 26वा वाढदिवस साजरा करत असून ती लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करत आहे.
थोडक्यात बातम्या-
लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
जो बायडन यांनी पुतिन यांना दिला गंभीर इशारा, म्हणाले…
“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं होतं हे सर्वांना माहिती”
तेल कंपन्यांचा सर्वसामान्यांना झटका, 13 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
“मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”
Comments are closed.