बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ अभिनेत्रीचा आपल्या आजीसोबतचा डान्स सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | अनेक अभिनेता-अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडणाऱ्या घडामोडी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अशातच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मराठी कार्यक्रमामध्ये ‘ईशा’ची भूमीका साकारणारी अभिनेत्री आदिती द्रविडने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे.

आदिती ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधते. तसेच ती अधून-मधून काही फोटोही शेअर करत असते. अशातच आदितीने तिचा आणि तिच्या आजीचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिती आणि तिची आजी डान्स करत असल्याचं दिसून येत आहे.

या व्हिडीओमध्ये आदिती आपल्या आजीला डान्स करायचं शिकवत आहे. त्याचबरोबर ती आजीला डान्सच्या काही स्टेप्सही शिकवत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आदिती आजीला एक-दोन अशा सूचनाही देत आहे. आदितीकडे पाहून तिची आजी त्या स्टेप्स करण्याचा प्रयत्न करत आहे. आदितीची आजी हे सगळं खूप उत्साहाने करत असून, तिची आजी खूप अॅक्टिव्ह असल्याचं दिसत आहे. त्यांच्याकडे पाहून त्या ही सगळी प्रोसेस एन्जाॅय करत आहेत, असं वाटत आहे.

आदिती आणि तिच्या आजीचा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला असून, या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना आदितीने ‘आजी रिको रिको डान्सच्या स्टेप्स शिकत आहे. हे करताना ही खूप सुंदर दिसत आहे’, असं तिने कॅप्शनही दिलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

‘सर माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?’; नेटकऱ्याला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

मुलगी हवी होती, मुलगा झाला; रागाच्या तडाख्यात दगडावर आपटून हैवान बापाकडून मुलाची हत्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More