बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खायला डब्बा दिलाय पण तो रिकामाच, संजय राऊतांची घटना दुरूस्तीवरून केंद्रावर टीका

नवी दिल्ली | आरक्षण हा आपल्या व्यवस्थेतील आजच्या घडीला सर्वात मोठा विषय आहे. प्रत्येक राज्य आपापल्या राज्यातील सामाजिक संतुलनावर भर देत असतं. विविध राज्यातील आरक्षणासाठी झालेली आंदोलन मग ती गुजरातमधील पटेल समाज, महाराष्ट्रातील मराठा समाज, राजस्थानातील गुर्जर समाज ही आंदोलन सामाजिक न्यायासाठी झालेली आपण पाहिली आहेत.

थेट आरक्षणाशी संबंध असणारी 102 वी घटना दुरूस्ती विधेयक आज सरकारने संसदेच्या पटलावर ठेवले आहे. यावरून आता राजकिय वातावरण तापलेलंं पाहायला मिळत आहे. घटनेच्या माध्यमातुन हा प्रश्न सोडवण्याचा केंद्र सरकारचा असलेला प्रयत्न हा अपुरा व राज्यांवर अन्यायकारक असल्याची टीका केंद्र सरकारवर होत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांंनी केंद्र सरकारवर या घटना दुरूस्तीवरून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने आरक्षणासाठी विधानसभेत ठराव संमत केला. पण कायद्याच्या चौकटीत ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळुन लावले मग उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची विनंती केली ती मोदींनी मान्य केली म्हणुनच ही दुरूस्ती आणली आहे. पण यामध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याची कोणतीच तरतुद नाही, हे म्हणजे डब्बा खायला दिला पण रिकामाच दिल्याचा प्रकार आहे.

आम्ही या विधेयकावर चर्चा करून आपली मतं मांडू व आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला पण केंद्राला देऊ असं राऊत या वेळी म्हणाले. आमचं धोरण हे आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लागावं असं आहे. कारण एका मोठ्या समाजाच्या न्यायाचा हा प्रश्न आहे, लोकसभेत हे विधेयक येतंय ते राज्यसभेत पण येईल, मग आम्ही विचार मांडू, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

राखी सावंतचा भालाफेकीचा कारनामा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमात केले बदल

“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”

आता विदेशातील नागरिकही घेऊ शकतात भारतात लस, केंद्राचा महत्वपुर्ण निर्णय

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More