‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं होळीचं मोठं गिफ्ट!

मुंबई | बँक ऑफ बडोदाने होळीच्या दिवशी गृहकर्जावरील व्याज कमी करण्याची घोषणा केली. कारण आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केली आहे. मात्र, बँक ऑफ बडोदाची ही विशेष घोषणा केवळ निश्चित तारखेसाठी आहे.

बँकेने म्हटलंय की, होम लोनचा दर 40 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.40% ते 8.5% ने कमी केला आहे. त्याच वेळी, MSME कर्जावर 8.4% दराने व्याज घेण्यास सुरुवात करेल.

दोन्ही प्रकारच्या कर्जावरील कमी केलेले दर 5 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत. यासोबतच हे नवे दर 31 मार्च 2023 पर्यंतच लागू होतील, असंही सांगण्यात आलंय.

बँक होम लोनवरील प्रोसेसिंग फीसमध्ये देखील पूर्णपणे सूट देत आहे. MSME लोनच्या प्रोसेसिंग फीसवर 50% सूट देत आहे. शुक्रवारी बँक ऑफ बडोदाचा शेअर बीएसईवर 5 टक्क्यांनी वाढून 172.95 रुपयांवर बंद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-