बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”

मुंबई | 10 दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी (Chief minister) वर्णी लागली. तर देंवेद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री (Deputy chief minister) पदाचा कार्यभार सांभाळतील. आधी सूरत मग गुवाहाटी त्यानंतर आता सर्व आमदार गोव्यात मुक्काम करत आहेत. गोव्यातून ते आज मुंबई परतील अशी माहिती समोर आलीये.

मुख्यमंत्रीपदासाठी इतकं का?, असं विचारलं असता आमचा संघर्ष सत्तेसाठी नव्हताच. ही लढाई आमच्या अस्तित्वाची होती. काही कारणास्तव आम्हाला मतदार संघात अडचणी आल्या. आमदारांना (MLA) कामाची  संधी मिळाली नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला, असं शिंदे म्हणालेत.

सगळे आमदार त्यांच्या इच्छेने आले होते. कोणालाही जोरजबरदस्ती केली नाही. शिवसेना महाविकास आघाडीत काम करण्यास असमर्थ होती. योग्य भूमिका शिवसेनेला घेता आली नाही. आताच्या मुख्यमंत्रीपदासाठी आमची भूमिका नव्हती. जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे हा निर्णय झाला, असं शिंदेनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

मी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हे माझ्यासोबत असणाऱ्या 50 आमदारांमुळे हे शक्य झालं. या 50 आमदारांना महाविकास आघाडी काळात जी कामं करण्यास मिळाली नाहीत ती संधी मी त्यांना देईन. याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून मी घेतली आहे, अस वक्तव्य एकनाथ शिंदेनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

थोडक्यात बातम्या

आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी 24 तास उपलब्ध- एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी

‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा

“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”

राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More