बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ही लढाई अशीच सुरू राहील- राहुल गांधी

नवी दिल्ली | देशभरातील पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, आणि पुदुच्चेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालांचे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. या निकालामध्ये भाजपला आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये मोठी आघाडी घेण्यात यश आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता कायम ठेवली आहे परंतू काँग्रेसला सर्वच ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.  यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेच्या निर्णयाचा स्वीकार करतो. निवडणूक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे लाखों आभार मानतो. तसेच काँग्रेसवर ज्यांनी विश्वास दाखवला, त्या सर्वांचेही आभार मानतो. मूल्य आणि आदर्शांची लढाई पुढेही सुरूच राहील. जय हिंद, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही. आज लोकांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. देशाचं प्रचंड नुकसान होत आहे, असं काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या 200पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

नितेश राणेंची महाविकास आघाडीच्या आमदारांना खुली ऑफर, म्हणाले ‘येणारा धोका समजा’

संजय राऊत म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना- देवेंद्र फडणवीस

‘क्रूर महिला पुन्हा सत्तेत आली’; ‘या’ भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ममता बॅनर्जींचं अभिनंदन, म्हणाले…

“बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे मोदी आणि शहांची लोकप्रियता कमी झाली नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More