बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘केंद्राने लसीचा साठा पाठवला पण…’; भाजपच्या या बड्या नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई | राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात राग निर्माण करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होता कामा नये. मात्र ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचून काम करत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत दरेकर बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्रानं सर्वाधिक लसीकरण केल्याचा दावा करते. मग या लसी केंद्र सरकारनं दिल्याशिवाय मिळाल्या का?, असा सवाल दरेकर यांनी विचारला. तर ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यासाठी राज्य सरकारनं आजपर्यंत केंद्राकडून आलेली मदत आणि त्यांनी नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या दोन गोष्टींची श्वेतपत्रिका काढावी, असं आव्हान दरेकर यांनी दिलं.

या पत्रकारपरिषदेत दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना खडे बोल सुनावले. लॉकडाऊनचा निर्णय हा राज्यांवर सोडावा, केंद्र सरकारनं देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर तो पाळणे सर्व राज्यांना क्रमप्राप्त आहे. आयुक्त हे केंद्र सरकारच्या वरती नाहीत. त्यामुळे त्यांनी मर्यादेत राहून बोलावं, असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी परदेशातून आलेली मदत कुठे गेली, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र, त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना विचारावा. या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या मदतीपैकी महाराष्ट्राला काय मिळालं, हा सवाल जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना विचारावा, असं प्रविण दरेकर यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या

‘आजी वारल्याचं का सांगितलं नाही?’; तरुणाला दोघा आत्तेभावांकडून जबर मारहाण

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमधील या खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन 

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, मग केंद्र सरकार काय करतंय?”

“संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही”

“उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, त्यांनी राजीनामा द्यावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More