औरंगाबाद | राज्यात सगळीकडेच कोरोनाने डोकं वर काढलं आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांसह राज्यभरातील अनेक नेत्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. आता मोठ्या नेत्यांमधून एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती स्वतः इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली होती. चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे.
औरंगाबादमध्ये मागील चार-पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. या दरम्यानच खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांनी सोशल मीडियावरुन याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘सर्वांना माझा नमस्कार, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तीन दिवसांपूर्वी मला कोरोनाची काही लक्षणे दिसली होती. त्यानंतर मी स्वतःला आयसोलेट केले होते. सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. तुम्ही सर्वजण घरी सुरक्षित रहा’.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्येही ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी थोडा कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची भर झाली आहे. 5 हजार 35 कोरोनाबाधीत रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 19 लाख 99 हजार 982 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.96 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.46 टक्क्यांवर आहे.
Salaam everyone
I have tested positive for Covid today.
3 days ago I had a few symptoms and had isolated since then.
Have been admitted for further treatment.Stay safe everyone, also remember in prayers.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) February 22, 2021
थोडक्यात बातम्या –
फेसबुकवर जुळलं प्रेम, एकाच दिवशी घरातून पळाल्या तीन बहिणी!
नवीन कार घेण्याचा विचार करताय; ‘ही’ कंपनी देतेय दीड लाखापर्यंतचा डिस्काऊंट
मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचली महिला, खरा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले
वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा
मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण