Top News महाराष्ट्र मुंबई

मनसेला धक्का! मनसेच्या या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | गेल्या 24 तासात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

मंदार हळबे यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेसाठी धोक्याची घंटा आहे. हळबेंच्या आधी एका मनसे नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला होता.

दरम्यान, मनसेचे प्रदेश उपाध्यक्षराजेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. कदमांच्या प्रवेशाने शिवसेनेची कल्याण डोंबिवलीतील ताकद आणखी वाढणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा….- गोपीचंद पडळकॉ

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा राज्यसभेतही बोलबाला

‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्

‘मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला’; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या