बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सरकारच्या डोक्यात घालण्यासाठी हे पुस्तक आणलंय’; राम सातपुते आक्रमक

मुंबई | आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकरी कायदे इत्यादी विषयांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच आता भाजपने विधानभवनाबाहेर ट्रेलर दाखवला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागण्यावरून भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. तर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीसांनी विधानभवनाबाहेर देखील सरकारवर टीकास्त्र चढवलं आहे.

स्वप्निल लोणकर या तरुणाने पुण्यातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज घडली. स्वप्नील लोणकर एमपीएससी परीक्षेत 2 वेळा उत्तीर्ण झालेला असतानाही नोकरी मिळाली नसल्याने नैराश्यात जाऊन त्याने हा निर्णय घेतला. यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात आता भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी एमपीएससीची पुस्तके घेऊन आंदोलन केलं आहे.

सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळतंय. अद्याप सरकारने परीक्षाबाबत कोणताही निर्णय घेत नाही. पार्थ पवार. रोहित पवार, आदित्य ठाकरे यांची सरकारला चिंता आहे, पण सामान्य घरातल्या गरिब मुलाची चिंता सरकारला नाही, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. त्यांनी आंदोलन करताना सी साॅटची पुस्तकं आणली होती. ही पुस्तकं सरकारच्या डोक्यात घालण्यासाठी आणल्याचं राम सातपुते यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजाताई मोरे व प्रशांत डीक्कर यांनी आज विधानभवनासमोर पीक विम्यासाठी आंदोलन केले. पीक विम्याचा बीड पॅटर्न रद्द करा अश्या घोषणा दिल्या. स्वाभिमानी संघटनेच्या शेतकरी आघाडीच्या नेत्या पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

“विरोधकांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत”

पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोडली ‘ही’ परंपरा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More