बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धवजींचं नाव घेतल्याशिवाय या बबली बंटीला प्रसिद्धी मिळत नाही”

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. नवनीत राणा यांनी दिल्लीमध्ये हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसाचा पाठ केला. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. त्यांना प्रसिद्धीची हाव खूप आहे. त्यामुळे उद्धवजींचं जे नाव आहे एक पक्षप्रमुख म्हणून नाव त्यांनी आणि मुख्यमंत्री कामाच्या माध्यमातून नाव तर मिळवलचं आहे. त्यांचं नाव पुर्ण जगात, महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहेच, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.

शिवसैनिक उद्धवजी आणि आदित्यच्या नेतृत्वात काम करत आहे. मुळामध्ये जाणून बुजून हनुमान चालीसाचा वाद निर्माण केला जातोय. हनुमान चालीसा ही हिंदूत्वाचे एक प्रतिक आहे. कारण नसताना फक्त हनुमान चालीसाहातात घ्यायची आणि कारण नसताना उद्धवजींचं नाव घेतल्याशिवाय या बबली बंटीला प्रसिद्धी मिळत नाही, असा खोचक टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे.

दरम्यान, आम्हाला कोणाचा अपमान करायचा नाही. मात्र तुम्ही खासदार आहात. संविधानातील पद तुमच्याकडे आहे. रवी राणा हे स्वत: एक आमदार आहेत. त्यांना पदाचा विसर पडलेला आहे. तुमच्या जबादाऱ्या काय आहेत?, कायदा आणि नियम पाळण्याची तुमची मोठी जबाबदारी आहे. त्याचा विसर पडत आहे, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

रूपाली ठोंबरे आक्रमक, केतकी चितळेला दिला गंभीर इशारा

 ‘लाजा वाटल्या पाहिजेत’; केतकीच्या पोस्टवर छगन भुजबळ भडकले

“भगवे वस्त्र चढवून हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे काही…”

‘विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी…’; अमोल कोल्हे संतापले

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More