Loading...

…म्हणून हे उमेदवार स्वत:ला मतदान करू शकले नाहीत!

मुंबई | काल(सोमवार) विधानसभेसाठी मतदान झालं. मात्र काही उमेदवार स्वत: निवडणुकीच्या रिंगणात असतानाही उमेदवारी एका मतदारसंघात तर स्वत:चं मतदान दुसऱ्या मतदारसंघात असल्याने स्वत:ला मतदान करू शकले नाहीत. कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये तर अमल महाडिक यांनी हातकगंलेमध्ये मतदान केलं.

पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवत आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांचं मतदान कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहे. त्यांनी तिथेच मतदान केलं.

Loading...

दुसरीकडे अत्यंत लक्षवेधी ठरलेली वरळीतली लढत इथेही दोन्ही उमेदवारांना स्वत:ला मतदान करता आलं नाही. आदित्य ठाकरेंनी वांद्रे पूर्व मतदारसंघात तर अभिजित बिचुकलेंनी साताऱ्यात मतदान केलं.

माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेंच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघात असल्याने त्यांना स्वत:ला मतदान करता आलं नाही. तसंच त्यांच्या आईला आणि सुशिलकुमार शिंदेंनाही प्रणिती यांना मतदान करता आलं नाही.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...