जगताप, काटे की कलाटे?, चिंचवडचा ‘हा’ उमेदवार आहे गडगंज श्रीमंत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Bjp Mla Laxman Jagtap) यांच्या निधनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं दिसतंय. यामध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये ही लढत असणार आहे. तीनही प्रमुख उमेदवार कोट्याधीश असल्याची माहिती शपथपत्रातून समोर आली आहे.

भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्याकडे 2 किलो सोन्यासोबतच 23 कोटींची संपत्ती आहे. तर भाजपचे डमी उमेदवार शंकर जगताप हे सोने, चांदी, ट्रॅक्टर आणि एका बंदुकीसह 23 कोटींचे मालक आहेत.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्याकडे एकूण 19 कोटींची संपत्ती असून, ज्यामध्ये 35 तोळे सोन्याचा समावेश आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातले तीनही प्रमुख उमेदवार हे कोट्यधीश आहेत. पण आपल्या दोन प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत नाना काटे हे संपत्तीच्याबाबतीत काहीसे पिछाडीवर आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी मिळालेले नाना काटे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सुमारे 19 कोटी 30 लाख 12 हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे

ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे तब्बल 35 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. उमेदवारांनी उमेदवारी अर्जसोबत सादर केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे 46 वर्षांचे आहे. त्यांचं बीकॉम पर्यंतचं शिक्षण झालंय. शेती आणि व्यापार हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-