बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”या’ प्रकरणाचा मुळाशी जाऊन तपास करावा’; निवेदिता सराफ यांची मुख्यमंत्र्यांसह, राज ठाकरेंना विनंती

मुंबई | मराठीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी शनिवारी पिंपरी चिंचवडमधील राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर मनोरंजनविश्वात संघटनांच्या मनमानी कारभारावर आवाज उठावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करत साप्ते यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

आज मला हा व्हिडीओ करताना खूप दु:ख होतंय. आमचे कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली. खरंतर कुठल्याही समस्यांवर आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. इतक्या प्रतिभावान, इतक्या मनमिळाऊ आणि इतक्या मितभाषी व्यक्तीला हे असं पाऊल का उचलावं लागलं?, असा प्रश्न निवेदिता यांनी व्हिडीओमधून केला आहे.

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्याकडे पाच प्रोजेक्ट्स होते. त्या पाच प्रोजेक्ट्समध्ये काम करणारी 30 ते 35 माणसं पोरकी झाली. हे सगळं का घडलं? माझी कळकळीची विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना, राज ठाकरेंना, अमेय खोपकरांना, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचा तपास केला पाहिजे. राजू साप्तेंच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदिता यांनी केली.

दरम्यान, राजू साप्ते यांच्याविषयी बोलताना निवेदिता म्हणाल्या की, ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेच्या निमित्तानं राजू साप्ते यांच्याशी भेट झाली. ते फारच टॅलेन्टेड होते. अवघ्या तीन ते चार दिवसांत त्यांनी आमच्या मालिकेचा सेट उभा केला होता. राज्याबाहेर जेव्हा शूटिंग करत असताना त्यांनी उपलब्ध साधनांमध्ये त्यांनी सेट उभारुन दिला होता.

 

थोडक्यात बातम्या – 

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर कंगनानं उपस्थित केला प्रश्न, म्हणाली…

“माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप यामुळे सरकारने मला क्लीन चीट द्यावी”

“काल जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं”

“खोटं कसं बोलावं हे महाविकास आघाडी सरकारकडून शिकलं पाहिजे”

‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरील शिल्पा शेट्टीच्या नृत्याने चोरलं चाहत्यांचं मन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More