काँग्रेसचा हा नेता म्हणतो ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. यावर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) भाष्य केलंय.

पुणे लोकसभा कोणाला द्यायची हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील. पक्ष जो उमेदवार देईल तो मान्य असेल. सात वर्षापासून पुण्यात भाजपने आश्वासनाची खैरात दिली. भाजपला (Bjp) लोक आता मतं देणार नाहीत, असंही धंगेकर म्हणाले आहेत.

रवींद्र धंगेकर पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत देखील महत्वाचं वक्तव्य केलंय. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल, असं ते म्हणालेत.

अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल. अजितदादा मोठे झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही आवडेल. अजितदादा हे दादा आहेत. दादा जे बोलतात तेच करतात, असं धंगेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-