बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

नवी दिल्ली | भारतात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यातच भारतातून दररोज परदेशात जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप प्राप्त केल्यानंतर जवळपासच्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

त्यातच आता भारतातुन कॅनडामध्ये जाणाऱ्या सर्व विमानांवर कॅनडा सरकारने कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच यामुळे आता भारतातुन कॅनडामध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांवर निर्बंधांची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. कॅनडा सरकारने आज निर्णय घेऊन या संदर्भात माहिती जाहीर केली आहे.

भारतातुन कॅनडाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पंजाबमधील लोक मोठ्या प्रमाणात कॅनडामध्ये स्थायिक असल्याचं दिसुन येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता कॅनडाला जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार असल्याचं स्पष्टपणे दिसुन येत आहे. एनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.

तब्बल महिनाभर म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत कॅनडा सरकारने भारतातुन येणाऱ्या सर्व विमानांवर पुर्णपणे बंदी घातली आहे. तसेच आता येणाऱ्या 21 ऑगस्टपर्यंत भारतातील विमानांवर बंदी घातल्याने भारतीय नागरिकांना या गैरसोयीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या

पोर्नोग्राफी प्रकरणी नवऱ्याला अटक झाल्यावर शिल्पाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 100 दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद

सैराटच्या आर्चीचं काळीज कुणी चोरलं?, पाहा नेमकं काय म्हणतेय…

हॉटेल, घरं भाड्यानं घेऊन पॉर्न शुटिंग, राज कुंद्राच्या रॅकेटची सर्व माहिती उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More