बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील कोरोनाचा अनुभव सांगताना ‘या’ क्रिकेटपटूला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ!

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारतातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा अनुभव सांगताना न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूला अश्रू अनावर झाले.

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टिम सीफर्ट भारतात असताना त्याचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. भारतामध्ये असतानाच कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर काय घडलं याबद्दल बोलताना टिम भावूक झाल्याचं पहायला मिळालं. याविषयी बोलताना, “मला जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं तेव्हा मला काही क्षण जग थांबल्यासारखं झालं. मला वास्तवाचं भान नव्हतं. पुढे काय होणार नाही याची मला कल्पना नव्हती. तुम्ही एखाद्या वाईट गोष्टींबद्दल ऐकता आणि विचार करता, तसंच माझ्यासोबतही झालं,” असं टिमनं सांगितलं.

आपला हा अनुभव सांगताना 26 वर्षीय टिम रडू लागला. नंतर थोडं थांबून त्याने पुढे परत आला अनुभव सांगितले. टिमने 2021 च्या आयपीएलमध्ये कोलकात्याकडून एकही सामना खेळला नाही. मात्र संघासोबतच असल्याने त्याला कोरोनाची लागण झाली. कोरोनावर मात केल्यानंतर टिम मायदेशी परतला.

दरम्यान, सीफर्टने कोरोनाबाधित असताना केलेल्या मदतीसाठी केकेआरचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम आणि चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे आभार मानले. “माझे प्रशिक्षक, तसेच केकेआर आणि चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कोरोनाकाळात फार मदत केली, मला सुखरुपपणे घरी पाठवण्याचेही त्यांनी संपूर्ण नियोजन केले.’ असं सीफर्ट म्हणाला.

 

थोडक्यात बातम्या – 

कोरोना रूग्णांचा तणाव कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी करतायेत ‘हे’ काम, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! वाढदिवसाची मित्रांना पार्टी देऊन घरी जाताना तरूणावर काळाचा घाला

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पु्न्हा कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात 10 रुग्णांचा मृत्यू

अल्पवयीन मुलाला महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून मारहाण, पाहा व्हिडीओ

अचानक फ्लाईटमध्ये कपलने सुरू केलंं किसिंग त्यानंतर एअरहोस्टेसने केलं असं काही की….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More