बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको”

पुणे | पुणे व्यापारी महासंघाच्यावतीने उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ नये अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. पुण्यात कडक निर्बंध लागू करावे पण परत लॉकडाउन नको अशी कळकळीची विनंती व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. दररोज हजारात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे पुण्यात पुन्हा एकदा लाॅकडाउन होण्याची चिन्हं दिसत असताना व्यापारी महासंघाने थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असताना कसेबसे दिवस काढले. आता परत लॉकडाउन केल्यानंतर हळूहळू पूर्वपदावर येत असलेला व्यवसाय पुन्हा एकदा डबघाईला येईल. अशी भीती या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांची ही मागणी अजित पवार मान्य करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा थांबताना दिसून येत नाही. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल दीड हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं कोरोनाचं संकट पुणेकरांवर अजूनही घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं, मास्क वापरण तसेच सोशल डिस्ट्न्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. नागरिक जेवढे निष्काळजीपणा करतील तेवढंच कोरोनाचं संकट वाढत जाईल.

थोडक्यात बातम्या

मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जण जखमी

नवऱ्याला खुर्चीला बांधलं, दाखवला पाॅर्न व्हिडीओ आणि धारदार चाकूनं कापला…

‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’; अनिल बोंडे आणि पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची! पाहा व्हिडिओ

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात 3 दिवसांचा जनता कर्फ्यू

संजना नाही तर आता ‘या’ माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More