बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यानं महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं; रुग्णसंख्येत घट, पण…

औरंगाबाद | औरंगाबादेत महिनाभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आलेख कमालीचा घसरला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण दुसरीकडे मृत्यूचं प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचं चित्र आहे.

औरंगाबादेत शनिवारी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर थेट 10.08 टक्के राहिला. यामुळे औरंगाबादेतील मृत्यूदर हा राज्यापेक्षा अधिक झाला. मृत्यूचं प्रमाण कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. मृत्यू पावणाऱ्या रुग्णांत ग्रामीण भागांतील रुग्णांचं प्रमाण चिंताजनक ठरत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी थेट शहरात येण्याची वेळ ओढावत आहे. अनेक रुग्ण उपचारांसाठी वेळीच दाखल होत नाहीत. तीव्र लक्षणे दिसत असतानाही त्रास सहन केला जातो. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालय गाठलं जातं. अशा परिस्थितीत मृत्यूचा धोका वाढतो. लक्षणे दिसल्यावर वेळीच रुग्णालयात दाखल झाल्यास कोरोनामुक्त होणं शक्य असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून विविध पातळीवर उपाययोजना केली जात आहे. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरही प्रशासनानं उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

8 वर्षाच्या प्रेमात मिळाला धोका, त्यानंतर प्रियकराने जे केलं ते पाहून पोलिसही चक्रावले

‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

“अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक, मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही”

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस- अशोक चव्हाण

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More