बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तब्बल वर्षभरानंतर कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद

नागपूर | संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने लोकांना हैराण करून सोडले आहे. भारतातही गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यातच नागपूर हे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं होतं. पण आता नागपूरमधील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात येतो. तसेच एकेकाळी नागपूरमध्ये झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. पण आता ही रुग्ण संख्या आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे. तब्बल वर्षभरानंतर नागपूरमध्ये काल सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

काल नागपूर शहरात फक्त 18 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ग्रामीण भागामध्ये 10 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच नागपुरमधील कोरोनामुळे मृत पावणार्‍या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल नागपूर जिल्ह्यात फक्त एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सध्या जिल्हाभरात 1770 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर नागपूर जिल्ह्यात 97.74 टक्‍क्‍यांवर गेला आहे. तसेच पॉझिटिव्हिटी दर हा 0.43 टक्क्यांवर आहे. वर्षभरानंतर नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने नागपूरकरांमध्ये दिलासादायक वातावरण पसरलं आहे.

थोडक्यात बातम्या –

मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार का?, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘या’ जिल्ह्यातील नागरिकांचा चिंतेत भर; कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

देशातुन कोरोना हद्दपार; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 75 दिवसांतील सर्वात मोठी घट

महागाईने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले; महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका

नाशिकमध्ये कोरोनानंतर ‘या’ आजारांनी काढलं डोकं वर; प्रशासनाच्या चिंतेत भर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More