बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदाच्या दिवाळीत अमृता फडणवीस चाहत्यांना देणार सुरेल दिवाळी गिफ्ट

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आवड म्हणून गायनकलाही जोपासत असतात. अनेकवेळा संधी मिळेल तिथे त्या आपल्या कलेला बगल न देता गाणं सादर करताना पाहायला मिळतात. तसेच त्या आपल्या गायनामुळे प्रसिद्धीझोतातही आहेतच.

अमृता फडणवीसांचे अनेक गाणे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तसेच नुकतंच त्यांनी एक गाणं प्रदर्शित केलं होतं आणि आता त्या आपल्या रसिक चाहत्यांसाठी दिवाळी गिफ्ट घेऊन आल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत त्यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांच्या दिवाळीत येणाऱ्या गाण्याला सोनु निगम यांची देखील साथ असणार आहे. त्यामुळे या गाण्याकडे सध्या सर्वांचं लक्ष असणार आहे. तसेच अमृता फडणवीस यांचं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमृता फडणवीसांचं नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे आणि या आरतीला सोनु निगम यांची स्वरसाथ असल्याने त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता लागली आहे.

थोडक्यात बातम्या

अन् राहुल गांधीनी भर बैठकीत विचारलं इथे कोण कोण दारू पितं?

धाकधुक पुन्हा वाढली! देशातील कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत वाढ, पाहा आकडेवारी

‘तो’ दाढीवाला ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र? पत्रकार परिषदेत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

हरभजन आणि पाकिस्तानी खेळाडूचं या मुद्द्यावरून रंगलं ट्विटर वॉर

काश्मीरमध्ये बनतोय ज्वालामुखी; फारुख अब्दुल्लांचा भाजपवर हल्लाबोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More