800 किमी पर्यंत धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक बाईकची होतेय जोरदार चर्चा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळं अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक वहनांची वाढती मागणी लक्षात घेता गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांचे(Electric Vehicle) नवनवीन माॅडेल बाजारात आणत आहेत.

गाडी खरेदी करताना ग्राहक गाडी किती अवरेज देत आहे, याचा विचार करत असतात. म्हणूनच तर तुम्ही जास्तीत जास्त अवरेज देणाऱ्या इलेक्टट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

सध्या ग्रव्हटन क्वांटा (Gravton Quanta) या इलेक्ट्रिक बाईकची(Electric Bike) भारतीय बाजारपेठेत जोरदार चर्चा आहे. कारण गाडी बनवणाऱ्या कंपनीने असा दावा केला आहे की, या इलेक्ट्रिक बाईकवर फक्त 80 रूपयांमध्ये 800 किमी पर्यंतचा प्रवास करता येतो.

कन्याकुमारी ते खारदुंग पर्यंतचा प्रवास करणारी ही देशातील पहिली इलेक्ट्रिक बाईक ठरली आहे. तसेच या बाईकची डिझाईन देखील खास आहे. त्यामुळं अनेकजण या गाडीला पसंती दर्शवित आहेत.

या गाडीमध्ये दोन बॅटरी ठेवण्याची सुविधा आहे. म्हणेज एक बॅटरी फुल चार्ज केल्यावर तुम्ही 150 किमी पर्यंत प्रवास करू शकता. पहिली बॅटरीची चार्ज संपल्यानंतर दुसऱ्या बॅटरीचा वापर करता येतो.

या गाडीमध्ये सध्या लाल, पांढरा, काळा हे तीन रंग उपलब्ध आहेत. या गाडीची किंमत 1 लाख 15 हजार रूपये आहे. अशातच जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ही गाडी घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या-