मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून पेट्राल-डिझेलचे दर(Petrol-Deisel) सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicle)क्रेझ वाढत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांचे वेगवेगळे माॅडेल बाजारात आणत आहेत.
आता Hyundai ही कंपनी देखील लवकरच इलेक्ट्रिक कार (Electric Car)लाॅंच करणार आहेत. या नवीन इलेक्ट्रिक गाडीचं नाव Hyundai Ioniq 5 आहे. खास म्हणजे या गाडीत वायरलेस फोन चार्जची सुविधा असणार आहे.
या गाडीत 12.3 इंचीचा टचस्क्रिन डिस्प्ले असणार आहे. तसेच हेड-अप डिस्प्ले आणि सनरूफ यांसारखे खास फिचर्स आहेत. तसेच ही कार भारतातील सुरक्षित कारपैकी एक असणार आहे.
या गाडीत दोन बॅटरीची सुविधा असणार आहे. लहान बॅटरी पॅक एकदा चार्ज केल्यास तुम्ही 385 किमी पर्यंतचा प्रवास करू शकता. दुसरा बॅटरी पॅक एकदा चार्ज केल्यावर तुम्ही 480 किमी पर्यंतचा प्रवास करू शकता.
या गाडीची किंमत भारतात 50 लाख रूपये असू शकते. जर तुम्ही जबरदस्त फिचर्स असलेल्या इलेक्ट्रिक गाडी घेण्याच्या विचार करत असाल तर तुम्ही या गाडीचा विचार करू शकता.
महत्वाच्या बातम्या-