बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर आलं आर्थिक संकट, उपचारालाही नाहीत पैसे

मुंबई | गेल्या 36 वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सध्या अनेक अडचणींचा सामना करतेय. अभिनेत्री शगुफ्ता अलीवर सध्या बिकट परिस्थिती आली आहे. कोरोना काळात हाताला काम नसल्याने तिला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शगुफ्ता यांच्याकडे स्वत:च्या आणि आजारी आईच्या उपचारासाठीही पैसे नाहीत.शगुफ्ता अलीने 15 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलंय. 20 पेक्षा जास्त लोकप्रिय मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका वठवल्या आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी शगुफ्ताने कामास सुरूवात केली होती. आज तिचे वय 54 वर्ष आहे. कोरोना काळात काम नाही, पैसे नाहीत, अशा अवस्थेत तिच्यावर घरातील सामान विकण्याची वेळ आली आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत शगुफ्ताने आपबीती सांगितली.

शगुफ्ता 20 वर्षांपासून आजारी आहे. तिला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर होता. या आजाराला तिने खंबीरपणे झुंज दिली आणि लढाई जिंकली. एवढच नाही तर स्पाॅटबाॅयला मुलाखत देत असताना सहा वषार्पुर्वी आपल्याला मधूमेह असल्याचं समजलं आणि तेव्हापासूनच इतर आजारही सुरु झाले असल्याचं शगुफ्ता यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, डायबिटीजमुळे पायात खुप दुखतं असल्याचं शगुफ्ता यांनी सांगितलं आहे. तसेच स्ट्रेसमुळे साखरेची लेवल वाढते, डोळ्यांना त्रास होतो, समस्या खूप आहेत मात्र हातात पैसे नाहीत, असं देखील त्या म्हणाल्या आहेत. मी आजारी आहे, आई आजारी आहे, मला काम हवंय, मदत हवीयं, अशा शब्दात शगुफ्ता यांनी मदत मागितली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…’; फडणवीसांचा सूचक इशारा

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More