Top News पुणे महाराष्ट्र

लाल महालासमोर गायला पोवाडा, या प्रसिद्ध शाहीराला पुण्यात अटक

Photo Credit- Twitter / @Prakashgadepat1

पुणे | अवघ्या महाराष्ट्रातं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात पार पडली. शिवजंयतीच्यानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रमांंचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली होती. त्यासोबतच गड किल्लांवर 144 कलम लागू केला होता तर रॅली, शोभायात्रा किंवा कुठल्याही प्रकारची गर्दी करण्यास पोलिसांनी मनाई केली होती. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शाहीर हेमंत मावळे यांनी पोवाडा गायला म्हणून त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

प्रसिद्ध शाहीर हेमंत मावळे यांनी पुण्यतील लाल महालासमोर शिवजंयतीनिमित्त आपल्या साथीदारांसह पोवाडा गायला. मावळेंचा पोवाडा ऐकण्यासाठी नागरिकांची काही प्रमाणात गर्दी जमू लागली. गर्दी वाढू लागली होती मात्र गर्दी हटत नव्हती त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट हेमंत मावळे यांना अटक केली.

सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली होती त्यामध्ये पोवाड्यावरही बंदी घालण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर हेमंत मावळे यांनी 15 फेब्रुवारीला पोवाडा गाण्याची परवानगी देण्यात यावी अशा मागणीचं पत्र सरकारला पाठवलं होतं. मात्र या पत्राला सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलं नाही. याचाच निषेध म्हणून मावळे यांनी लाला महालासमोर पोवाडा गायला असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, राजकीय मंडळींच्या कार्यक्रमांना परवानगी मिळते मात्र शिवजंयती साजरी करण्यासाठी सरकार निर्बंध लावत असल्याने नागरिकांनीही सरकारवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सरकारचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम डुप्लिकेट कारण…’; निलेश राणेंची टीका

कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज धक्कादायक वाढ, लोकहो काळजी घ्या!

अर्जुन तेंडुलकर मेहनती मुलगा; अंबानींकडून सचिनच्या मुलाचं तोंडभरुन कौतुक!

“ठाकरे सरकारचे शिवजयंतीवर निर्बंध मात्र शरद पवारांच्या उपस्थितीत मटणपार्टीला परवानगी”

गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या