
पणजी | गोवा राज्यातील राजकारणात आपले अधिराज्य गाजवणारे, अनेक सरकारी कामात महत्वाची भुमिका बजावणारे माजी उपमुख्यमंत्री अॅड. दयानंद नार्वेकर काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
पक्षाच्या कार्याला बळकटी देण्यासाठी त्यांच्या पुर्नप्रवेशाची हालचाल सध्या सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील त्यांचा पुर्नप्रवेश काँग्रेससाठी बराच लाभदायी ठरण्याची शक्यता आहे.
बार्देस तालुक्यातील बऱ्याच मतदारसंघात आजही प्रभाव असलेल्या नार्वेकरांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यास, त्याचा बराच फायदा काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 1 महिन्यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करुन स्वत:चा ‘गोवा डॅमोक्रेटीक फ्रंट’ हा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या-
-आघाडीला ‘राज’ साथ देणार का? अजित दादांचं आमंत्रण स्विकारणार?
–मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल
–शरद पवारांच्या नुसत्या नावानं ‘माढ्यातलं’ वातावरण झालंय टाईट!
–सोशल मीडियाचा वापर वाढवा; प्रियांका गांधींचा काँग्रेस नेत्यांना सल्ला
–मोदी पुन्हा जिंकतील का? मोदींचा भाऊ म्हणतो…