मुंबई | सत्तांतरानंतर शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत आहे. आरोप- प्रत्यारोपासोबतच आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) चौकशीही केंद्र सरकारकडून होणार आहे. पक्षाची गळती चालूच आहे. आणखी काही आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले होतील असे कयास लावले जात होते. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे
शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आज दिल्लीत एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळे खोतकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं का? अशा चर्चा आता रंगत आहेत. या भेटीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांचा समेट झाल्याची चर्चा आहे. दानवे आणि खोतकर यांच्यात काही राजकीय वादही होते. ते दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत झा.ला
दोन दिवसांपूर्वी खोतकरांची दिल्लीत एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना हात जोडून नमस्कार केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी त्यांनी आपण कोठेही जाणार नसून आयुष्यभर शिवसेनेतच राहू असं स्पष्टीकरण दिलं होतं. ही भेट सहजच झाली असून ते शिंदे गटात सामील होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अर्जुन खोतकर हे 2016 मध्ये महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री (Minister of State) होते. ते मराठवाड्यातील जालना येथील शिवसेनेचे नेते आहेत. अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरू होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु होती. तर अर्जुन खोतकरांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याचंही म्हटलं जात आहे.
थो़डक्यात बातम्या
मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…
पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
असदुद्दीन ओवैसींचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, म्हणाले…
मंकीपाॅक्सच्या ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर
Comments are closed.