बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब… ‘या’ तरुणीला कोरोना लसीचे तब्बल 6 डोस एकाच वेळी दिले, त्यानंतर…

नवी दिल्ली |  जगात कोरोना साथीच्या रोगास सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. या काळात दुसरी आणि काही ठिकाणी तिसरी लाटही आली. या लाटेत कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वाढला.  त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोविड वर्षाच्या कालावधीत लॉकडाऊन, आर्थिक संकट, वैद्यकीय संशोधन, बर्‍याच देशांमधील आघाडीच्या कामगारांची मेहनत यांसह अनेक बाबींवर बर्‍याच बातम्या आल्या.

त्याचवेळी, एक विचित्र बातमी समोर आली आहे जी कोरोना लसीकरणाशी संबंधित आहे. कोरोनाशी लढण्यासाठी लसीचे दोन डोस पुरेसे आहेत. मात्र, इटलीमध्ये एका तरुणीला चक्क 6 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 23 वर्षीय मुलीला नुकतेच फायझर-बायोटेक लसीचे 6 डोस दिले गेले आणि ते सर्व एकाच वेळी.  एजीआयने या संदर्भात सोमवारी वृत्त दिले की, चुकून महिलेला इतके डोस दिले गेले.

मात्र, दिलासा देणारी बातमी म्हणजे लसीचा डोस घेतल्यानंतरही ही तरुणी ठीक आहे. ती एकदम ठणठणीत आहे. तिच्यावर लसीच्या अतिडोसचा कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. तसेच, ओव्हरडोस लस घेतल्यानंतर लगेचच तिला फ्लुइड्स आणि पॅरासिटामाॅल देण्यात आले.

दरम्यान, ‘एएफपीच्या’ वृत्तानुसार देशाच्या वैद्यकीय नियामकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. असे सांगण्यात आले की, सध्या ही लस 90 देशांतील लोकांना दिली जात आहे. लवकरच ही कंपनी सिंगापूरमध्येही या लसीचे उत्पादन सुरु करणार आहे.

थोडक्यात बातम्या –

कोविशिल्डनंतर आता ‘या’ लसीची निर्मिती महाराष्ट्रात होणार

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पोलिसांचा आक्रमक पवित्रा; नियम न पाळल्यास दांडुक्याचा होणार वापर

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जणू कोविडॉलॉजिस्टच; महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर’

“तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता…”; अधिकाऱ्याला धमकवणं पडलं महागात

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, जाणून घ्या आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More