मुंबई | राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात जोपर्यंत वीजजोडणी सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा जाहिर निषेध आहे. हे सरकार कोडगं आहे, संवेदनहीन आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. हे सरकार बेवड्यांसाठी पॉलिसी करू शकतं. मात्र, शेतकऱ्यांसाठी नाही. सातत्याने नापिकी आहे. अतिवृष्टी होते, कोरड आहे. त्यामुळे वीज कापू नका, अशी मागणी शेतकरी करत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
दोन वेळेस राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन कापणार नाही, असं आश्वासन दिलं आहे. पाचशे सातशे भरले तरी वीज कनेक्शन कापणार नाही, असं म्हटलं होते. परंतु, अजित पवारांच्या शब्दाला किंमतच नाही. वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्यांच्या आश्वासनाला, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
दरम्यान, काही शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं असलं तरी डीपी काढून नेले जात आहेत. सगळ्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जात आहे. हातातोंडाशी आलेली पिक हिरावली जात आहेत. शेतकऱ्यांचा असंतोष सभागृहात मांडला आहे. आमची शेतकऱ्यांना विनंती आहे की, कोणाही टोकाचं पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचं संकट, तज्ज्ञांचा गंभीर इशारा
मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर
मोठी बातमी! नवाब मलिकांना ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी
‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा आक्रमक
“ED आणि BD ची तुम्ही चिंता करु नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची CD निघाली तर…”
Comments are closed.