बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथं आमच्या भगिनी कधीही लाचार होणार नाहीत”

मुंबई | काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने कारवाई धाडी टाकल्या आहेत.. अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. त्यानंतर काल पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मला दिल्लीतील एका नेत्याने सांगितलं की, तुमचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत, पण त्यादिवशी तुम्ही जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख केला, ते काही रूचलं नाही. त्यामुळे तुमचा पाहुणचार झाला. दिल्लीतून या सरकारला त्रास दिला जातोय. लोकशाहीमध्ये तुम्हाला एखादं मत मांडण्याचा काही अधिकार आहे की नाही? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.

एखादं मत मांडता म्हणून तुम्ही धाडी टाकता आणि ते देखील अशा पद्धतीने ज्याता बाया बापड्या आणि मुलीचा ज्याचा संबंध नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा जिजामाता आणि सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. हा अहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे. इथं आमच्या भगिनी कधीही लाचार होणार नाहीत. तुम्ही छापा मारा नाहीतर काहीही करा आपलं मत मांडल्याशिवाय राहणार नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत

दरम्यान, मी आवाहन करतो की, महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला पाहिजे. 11 ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा बंद आपण यशस्वी केला पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधानांच्या कानापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’चा आवाज पोहोचवणार”

‘तुम्ही त्याच्या भविष्यासोबत….’; रविना टंडनही भडकली, बॉलिवूड तारकांचा आर्यनला पाठिंबा, !

“महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही”

सर्वोच्च न्यायालयाने केली लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

एनसीबीनंतर आता डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईतून जप्त केले 25 किलो ड्रग्ज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More