बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

” उद्धव ठाकरे तर पार्टटाईम मुख्यमंत्री, फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा “

मुंंबई | भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक वसंत स्मृती दादर येथे आज पार पडली. या बैठकीला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रभारी सी.टी. रवि यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे.

ते म्हणाले, ‘आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे. फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा.’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहित आहे. या सरकारला जनतेत राहण्याचा अधिकारच नाही, अशी खोचक टीका रवि यांनी केली आहे.

याशिवाय त्यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीला लक्ष्य करत महाविनाश आघाडी असं संबोधलं आहे. ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हिंदूना नाव ठेवत आहेत. त्यांच्या सारखी शिवसेना आहे. असं म्हणून “हे सरकार महाविकास आघाडी सरकार नाही  तर महाराष्ट्र विनाश सरकार आहे”, असा टोला लगावला आहे.

याशिवाय त्यांनी यावेळी शिवसेनेवरदेखील टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, “जो पक्ष हिंदू रक्षणासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटूंबांची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्याचं काम सुरू आहे”, असा घणाघातही रवि यांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“निवडणुका जवळ आल्याने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला”

“बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”

हार्दिक पांड्याच्या अडचणी वाढल्या; कस्टम विभागाकडून मोठी कारवाई

ॲमेझॉनवरून चक्क करण्यात येत होती गांजा तस्करी, असा झाला पर्दाफाश

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 महिन्यानंतर मोठी घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More