मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत कायमस्वरूपी घरे देण्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर अनेक स्तरातून टीका होत आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
आमदारांच्या दाढ्यांना हात लावून हे सरकार चाललं आहे. आमदार पळून जातील आणि सरकार पडेल, अशी भीती सरकारलाआहे. त्यामुळे आमदारांवर इतका वर्षाव सुरू आहे. चार कोटींचा आमदार निधी दिला आहे. तो आधी मुळात दोन कोटी इतका होता. कोरोना असतानाही चार कोटी निधी दिला. सहाय्यकांचे पगार वाढवले. घरे देणार आहेत. कशासाठी हवी आहेत घरं?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आमदार होण्यासाठी कोणी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता. मी आमदारांचा रोष पत्करून हे बोलत आहे. माझं मुंबईमध्ये घर नाही. तरीही मला घर देऊ नका. तेच पैसे शेतकऱ्यांना द्या, एसटी कर्मचाऱ्यांना द्या, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. मी आणि सदाभाऊ खोतांसारखे सोडले तर प्रत्येक आमदाराची मुंबईत चार चार घरं आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही आमची घरं चालवताना समाजाचं शोषण करून किंवा भ्रष्टाचार करून घरं चालवली नाहीत. पटो किंवा नाही पटो या जन्मी केलं तर याच जन्मी फेडावं लागणार आहे. आम्ही जर काही केलं असेल तर आमच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयावरही तुमचा आक्षेप सुरू झाला आहे. तुमचा बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास राहिला नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, आम्ही थांबणार नाही”
मोठी बातमी! शिवसेनेचा आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर, कोट्यवधींची मालमत्ता जप्त
मोठी बातमी! पुतिन यांचा रशियन सैन्याला मोठा आदेश
…म्हणून महाविकास आघाडीच्या आमदाराला भर विधानसभेत रडू कोसळलं!
“यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?”
Comments are closed.