Top News महाराष्ट्र मुंबई

“हे शिवभक्तांचं सरकार, लोकांच्या सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेेले आहेत”

Photo Credit- Uddhav Thackeray Twitter

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे यावर्षीच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतलेली आहे. त्याचबरोबर सरकारने शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते सरकारला धारेवर धरलं आहे. यावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कोरोना अजून गेलेला नाही. राज्य सरकारने सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेले आहेत. शिवजयंतीला विरोध असणं शक्य आहे का? असा सवाल उपस्थित करत हे शिवभक्तांचं सरकार आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

कोणालाही शिवजयंती दिवशी कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, असं सरकारने सांगितल्यामुळे शिवभक्त नाराज झाले आहेत. अशातच राज्य सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारविरोधात शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या तख्तावर औरंगजेब बसला असं म्हणत भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले होते. तसंच आजपर्यंत सरकारमधील मंत्र्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर या सरकारने कधीच आक्षेप घेतला नाही. मात्र शिवजयंती उत्सव साजरा करताना सरकारला कोरोनाची नियमावली आठवते. या मुघल विचारसरणी असणाऱ्या सरकारचा निषेध, असं ट्विट भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

पैशांचा मिटर तुटला… युवराज सिंगला लागलेल्या बोलीचा रेकॉर्ड ‘या’ खेळाडूनं तोडला!

गजानन मारणेला आणखी मोठा धक्का, पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

बबब… छप्पर फाडके पैसा!!! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला लागली जबरदस्त बोली

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या