बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून…”

रायगड | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी नवाब मलिकांच्या अटकेचा निषेध दर्शविला आहे. त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

एका देशद्रोही व्यक्तीसाठी सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन करता हे दुर्देव आहे. खरंतर या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. कारण एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये घेतलं आणि त्याचं समर्थन करत आहेत. अशांना या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी जोरदार टीका नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी बोलताना दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला. कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचारी करत आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहे. यापेक्षा वाईट गोष्ट नाही, उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसलेल्या सर्वांना देशद्रोह कायद्याखाली अटक करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, नारायण राणे आज भराडी देवीच्या दर्शनाला गेले होते. यावेळी पत्रकारांनी देवीकडे काय साकडे घातले? असे विचारलं असता काहीजण राणे कुटूंबियाविरोधात सुडबुद्धीने, आकसाने, व्देषाने वागत आहेत. त्यांना दिर्घआयुष्य दे आणि या सर्वांच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला बळ दे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आघाडी सरकारमधील नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावतील”

युक्रेनच्या ‘या’ अभिनेत्रीच्या पाठीवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो, पाहा फोटो

Russia-Ukraine War | केंद्र सरकारकडून भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

“बाळासाहेब म्हणायचे दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार”

रशियाकडून युक्रेनच्या दहा शहरांवर बॉम्ब हल्ला, ‘इतक्या’ नागरिकांचा मृत्यू 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More