बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हे सरकार नुसतं टिकणारच नाही तर पाच वर्षे टिकेल- शरद पवार

मुंबई | महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका घेतल्या. पण शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहेत. शिवसेना हा विश्वासहार्य पक्ष आहे. लोकांच्या विश्वासावर हे सरकार काम करत आहे. त्यामुळे हे सराकर नुसतं टिकणारन नाही तर पाच वर्षे टिकेल, असं शरद पवार म्हणाले.

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

अनेक लोक आपल्याला सोडून गेले. पण नवीन लोक तयार झाले आहेत. नव्या लोकांचं कर्तृत्व कधीच दिसलं नव्हतं. त्यांना सधी मिळाली आणि त्यांचं कर्तृत्व समोर आलं. देशभर कोरोनाचं संकट असताना राजेश टोपेंनी चांगलं काम केलं. राजेंद्र शिंगणेही चांगलं काम करत आहेत. राजकारणात तरुणांना नेहमीच संधी दिली पाहिजे. पिढी तयार केली पाहिजे. राष्ट्रवादीने ही पिढी तयार केली आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

शाहु-फुले-आंबेडकर विचारांनीच महाराष्ट्र चालेल- अजित पवार

“…म्हणून भाजपला गेल्या सात वर्षांपासून यश मिळतंय”

तहान भागवण्यासाठी हत्तीने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील- चंद्रकांत पाटील

बारावी नापास म्हणून ‘खिल्ली’ उडालेल्या मनसे नेत्यानं जिद्धीनं पूर्ण केली पदवी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More