बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंडचा तारणहार आला! ‘या’ धाकड खेळाडूचं लवकरच संघात पुनरागमन

लंडन | सध्या जगभर टी ट्वेंटी विश्वचषकाची जोरदार चर्चा होत आहे. जगातील अव्वल 12 संघामध्ये विजेतेपदासाठी युएईमध्ये चुरसीचे सामने होत आहेत. 12 संघांना अ आणि ब गटात विभागलं आहे. प्रत्येक गटात 6-6 संघांचा समावेश आहे. वनडे विश्वचषकाचा गतविजेता इंग्लंड संघ अ गटात असून सध्या इंग्लंडचे खेळाडू पूर्ण फाॅर्ममध्ये नाहीत. अशातच आता इंग्लंड संघासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं तब्येतीच्या कारणावरून अनिश्चित काळासाठी खेळापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्या तो पूर्णपणे बरा असल्याचं त्याच्या डाॅक्टरांचं म्हणणं आहे. अशातच आता काही महिन्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक अॅशेस कसोटी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट मंडळानं स्टोक्सच्या उपलब्धतेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

इंग्लंड क्रिकेट मंडळानं अॅशेससाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यात बेन स्टोक्सचंही नाव असल्यानं सर्वत्र स्टोक्सच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या आहेत. यापूर्वी स्टोक्स आयपीएल आणि सध्या चालू असणाऱ्या विश्वचषकाचा सुद्दा भाग नव्हता. परिणामी इंग्लंड संघाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. स्टोक्सच्या पुनरागमणानं इंग्लंडचा संघ संतुलित आणि ताकदवान होणार आहे.

दरम्यान, बेन स्टोक्सची गणना सध्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते. बेन स्टोक्सनं अनेकदा इंग्लंडला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्ये सुद्धा बेन स्टोक्सवर सर्वाधिक बोली लागली होती. बेन स्टोक्सच्या समावेशानं अॅशेसमध्ये इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियासमोर आव्हान उभं करू शकतो.

पाहा पोस्ट-

 

थोडक्यात बातम्या 

ड्रग्स प्रकरणावर राज्यपाल कोश्यारीचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

फाडफाड इंग्रजी शिकायचीय?, मग Google करेल तुमची मदत!

‘माझे वडील हिंदू तर आई मुस्लीम, पण मी…’; मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचं प्रत्युत्तर

पेट्रोल आणि बिअरची तुलना केल्याने शत्रुघ्न सिन्हा ट्रोल! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; वाचा चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More