बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकीय हालचालींना वेग, काँग्रेस आमदारांचा ‘हा’ गट भाजपात विलीन होणार

पणजी | महाराष्ट्रातील सत्तानाट्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. महाराष्ट्रातील सत्तातरानंतर गोव्यातील (Goa) राजकारणात देखील मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

गोव्यात काँग्रेसला (Congress) मोठं खिंडार पडलं आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. फुटीर काँग्रेस आमदारांच्या या गटाने मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची (Pramod Sawant) भेट देखील घेतली.

काँग्रेस विधीमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. एल्टन डिकोस्टा, युरी आलेमांव आणि कार्लुस फेरेरा हे तीन आमदार सोडले तर काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, एकिकडे केंद्रातील भाजप सरकारला तगडं आव्हान देण्यासाठी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. मात्र, दुसरीकडे गोव्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन् भर कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहांची जीभ घसरली

नवीन फोन घेत असाल तर थांबा, Samsung Galaxy A32 च्या किमतीत मोठी घसरण; वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More