बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीनच्या तरूणीने गायलं ‘हे’ हिंदी गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

बीजिंग | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात. तर काही प्रेरणा देणारे. तसेच काही व्हिडीओ हे डान्स, गाण्याचेही असतात. आपल्याला माहित असेल की गाणं जितकं ऐकायला मधूर आणि सहज वाटतं तितकं ते म्हणायला खूप अवघड असतं.

गाण्यासाठी गायक कित्येक वर्ष गाण्याचा सराव करत असतात. आपल्या देशामध्ये गाणं म्हटलं की सर्वात पहिले लता मंगेशकर यांचं नाव सर्वांच्या समोर येतं. त्यांच्या आवाजाला तोडच नाहीये. त्यांनी आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. तसेच त्यांचं प्रत्येक गाणं हे खूप गाजलं आहे.

सध्या सोशल मीडियावर एका तरूणीचा गाणं म्हणतानाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही तरूणी चीनमधील असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे त्या तरूणीने चक्क हिंदी गाणं गायलं आहे. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की एका गाण्याच्या कार्यक्रमामध्ये त्या तरूणीने ‘मोहब्बते’ या हिंदी चित्रपटातील ‘आँखे खुली’ हे गाणं गायलं आहे.

ती ते गाणं इतक्या सहजतेने गात आहे. तरूणीचा हा व्हिडीओ पाहून देशातील लोकांनी तिला लता दिदींची उपमा दिली आहे. तसेच तिचं कौतुकही केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या- 

विवाहित प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबध ठेवण्यास केली जबरदस्ती; नकार देताच उचललं धक्कादायक पाऊल

“15 लाखांसाठी भारतीय गेल्या सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा”

दुचाकीस्वाराने पोलिसाला फरफटत नेलं; सीसीटीव्ही फुटेज समोर, पाहा व्हिडीओ

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने केलं रिव्हर्स ड्रायव्हिंग, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More