राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर पंकजा मुंडेनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
बीड | बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका 20 मार्चला होणार आहेत. या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यासाठी बंदी घातल्याने पंकजा मुंडे यांनी थेट राज्यपालांकडे या संदर्भात तक्रार केली.
आता भारतीय जनता पक्ष 20 मार्चला होणाऱ्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकत आहे. अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्यानं निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
औरंगाबाद तसेच इतर जिल्ह्यांना जो न्याय मिळतो तो बीड जिल्ह्याला मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असल्याचं पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं. यासंदर्भात राज्यपालांकडे तक्रार करताना पंकजा मुंडे यांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनात सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचं कारस्थान रचलेलं आहे आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे.
या दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संचालकांची तसेच सर्व उमेदवारांची बैठक घेऊन महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांचा परिचय करून घेतला. भाजपने जरी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत पॅनलने या निवडणुकीसाठी चांगलेच दंड थोपटले असल्याचं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…
आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी
महाराष्ट्र सरकारकडुन कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी; ‘हे’ आहेत नवे नियम!
‘कार ॲंड बाईक’चे 2021 चे पुरस्कार जाहीर, पाहा कोणत्या गाड्यांनी मारलीय बाजी
धक्कादायक! कोरोनाबाधित रूग्णाने हॉटेलवर जात दारू पिऊन केलं जेवण अन्…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.