शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी अमित शहा मैदानात?, महत्त्वाची माहिती समोर
नवी दिल्ली | शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेने या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता.
शिंदे गटाने सुद्धा या आरोपाला सिद्ध करत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याची तयारी दाखविली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री शिंदे यांची बडोद्यात भेट घेतल्याचे वृत्त आहे.
आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या वादात उडी घेतली आहे. शिवसेना नेते आणि एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. शिवसेनेचे जे नेते आणि आमदार बंडात गेले आहेत त्यांच्या कार्यालयांवर हल्ले केले जात आहेत.
सर्व आमदार मुंबईला आल्यावर मोठा राजकीय गोंधळ होणार आहे. शिवसेना नेेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात फोनवर काय चर्चा झाली? हे पाहाणं महत्वाचं ठरेल.
थोडक्यात बातम्या –
“काय झाडी.., काय डोंगार.., काय हाटेल….. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का?”
“हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा”
‘कब तक छीपोगे गोहाटीमे’; झिरवळांचा फोटो शेअर करत राऊतांनी आमदारांना डिवचलं
संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
Comments are closed.