बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्र सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा!

नवी दिल्ली | कोरोना महामारीत देशातील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. इंधन दरवाढ आणि महागाईमुळे सर्वसामान्य माणूस या सगळ्या परिस्थितीत भरडला जात असल्याचं चित्र आहे. अशातच आता केंद्र सरकारने नोकरी गमवणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी एका औपचारिक योजनेची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने सांगितलं की, कोरोना काळात ज्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी नोकरी गमवली आहे. त्यांच्या खात्यात 2022 पर्यंतचे पीएफचे पैसे सरकार जमा करणार आहेत. परंतु, ज्या कर्मचाऱ्यांनी ईपीएपमध्ये नोंदणी केली आहे, त्याच कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

ज्यांची युनिट्स ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असतील, त्यांनाच औपचारिक क्षेत्रातील छोट्या नोकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी परत बोलवण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकार 2022 पर्यंतच्या नियुक्त्या त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पीएफचा हिस्सा देणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, कोरानाच्या या महामारीच्या काळात रोजगारावरील संकट पाहता, मनरेगाचे यंदाचे बजेट 60 हजार कोटी रूपयांवरून 1 लाख कोटी करण्यात आलं आहे, असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. ज्यांचा रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला. त्यांचा पीएफ 2022 पर्यंत सरकार भरणार असल्याचंही केंद्रानं स्पष्ट केलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

बैलगाडा शर्यतीबाबत गृहमंत्री दिलीप-वळसे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपमध्ये येण्यास नारायण राणेंची खुली ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More