Top News

उदय सामंतांनी प्राध्यापकांसाठी केली ही मोठी घोषणा!

नागपूर | राज्यातील प्राध्यपकांनी 2013 मध्ये केलेल्या 71 दिवसांच्या संप काळातील वेतन देण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यातील प्राध्यापकांचे दिनांक 4 फेब्रुवारी 2013 ते दिनांक 10 मे 2013 या 71 दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 12515 अध्यापकांना होणार असून एकूण 191.81 कोटी थकीत वेतन त्यांना मिळणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

संप संपल्यानंतर राज्य सरकारने आंदोलन काळातील प्राध्यापकांचा पगार दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर प्राध्यापक संघटनांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेविरोधात उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही प्राध्यापकांच्या बाजूने निकाल लागला.

संप संपल्यानंतर राज्य सरकारने आंदोलन काळातील प्राध्यापकांचा पगार दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर प्राध्यापक संघटनांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेविरोधात उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही प्राध्यापकांच्या बाजूने निकाल लागला. यामध्ये प्राध्यापकांना त्यांचा 71 दिवसांचा पगार द्यावा. तसेच या रकमेवर 8 टक्के व्याज द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

महत्वाच्या बातम्या-

”दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक”

‘मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे’; रितेश देशमुखचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

‘सोशल मीडियावर फक्त रिकामटेकडे लोक असतात’; कंगणा राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘मिळालेला मंत्रिपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडू…’; भाजपची मंत्री कडूंवर जहरी टीक

“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या