बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर पुण्याच्या महापौरांचा ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्यात आली होती.  या बैठकीत पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार आहोत. येत्या आठ ते दहा दिवसांत 550 बेड उपलब्ध केल्या जातील.  तसेच आज 55 बेड उपलब्ध होतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खासगी रूग्णालय चालकांची बैठक आयुक्त घेणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तरी पुणेकरांनी कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं शहरातील आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या भागात 550 कोविड केअर बेड उपलब्ध आहेत. तर खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, पुण्यात सध्या 23 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी फक्त 2 हजार 300 रूग्ण रुग्णालयात दाखल आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या कोरोनाची लक्षणं सौम्य आहेत. त्यामुळे जर गरज पडली तर जम्बो हॉस्पिटलमध्ये 800 बेड उपलब्ध करुन देण्यात येतील. तरी काळजीची गरज नाही, यंत्रणा सज्ज आहे, असं पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.

दरम्यान, महापालिका खासगी हॉस्पिटलसोबत बेड उपलब्ध करुन देण्याबाबत करार करणार आहे. पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सिम्बॉयसिस हॉस्पिटल यांसह इतर रुग्णालयासोबत हा करार केला जाणार आहे, असंही विक्रम कुमार यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

अनिल देशमुखांच्या घराचं CCTV फुटेज तपासा; परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात

“चौकशी पूर्ण होईपर्यंत अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या”

मराठवाड्यातील ‘हा’ जिल्हा संपूर्णत: लॉकडाऊन होणार; पालकमंत्र्यांनी दिले आदेश

बसा बोंबलत! ‘पॉर्न’ बघणाऱ्या मुलाला किम जोंगने दिली ‘ही’ शिक्षा

अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More